५. बाजाराचे प्रकार व पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती
(Forms of Market and Price Determination under Perfect Competition )


प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .

१.पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तु एकजिनसी असतात .

२.मक्तेदारीच्या बाजारात मूल्यभेद केला जातो.

३.ज्या किंमतीला वस्तूची मागणी व वस्तुचा पुरवठा समान होतो, त्या किंमतीला समतोल किंमत असे म्हणतात.

४.विक्रेता मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजारामाध्ये वस्तु भेद निर्माण करतो.

५.मक्तेदार म्हणजे एक विक्रेता असणे होय.




ब] जोड्या लावा

१)मक्तेदारी  – अवास्तव नफा
२)वस्तूभेद  – मक्तेदारीयुक्त स्पर्धा
३)रेल्वे सेवा – सार्वजनिक मक्तेदारी
४)पूर्ण स्पर्धा – वाहतूक खर्चाचा अभाव
५)शुद्दस्पर्धा  – प्रो. चेंबेरलीन




क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

१) मक्तेदारीयुक्त स्पर्धेत किंमत भिन्नता असते .
उत्तर – बरोबर

२) मक्तेदारी बाजारपेठेत उद्योगसंस्था म्हणजेच उद्योग असतो .
उत्तर – बरोबर

३) पूर्ण स्पर्धेत मूल्यभेद करणे अशक्य असते.
उत्तर – बरोबर

४) पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूंची किंमत, मागणी व पुरवठ्याच्या संतुलंनंनुसार ठरते .
उत्तर – बरोबर