७. समग्रलक्षी अर्थशास्त्र ओळख
Introduction to Macro Economics




प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .

१.समागरलक्षी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनचा विकास
करण्याचे श्रेय लॉर्ड केन्स यांना दिले जाते.

२.देशातील भाववाढीच्या प्रश्नाचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रात केला जातो.

३. समग्रलक्षी अर्थशास्त्रात वस्तूच्या किंमत निश्चितीचा अभ्यास केला जात नाही.

४. आर्थिक वृद्धी हा समाग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे.

५. सूक्ष्मलक्षी व समग्रालक्षी अर्थशास्त्र पूरक आहेत.



ब] जोड्या लावा

१)सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र    – आंशिक समतोल
२)समग्रलक्षी अर्थशास्त्र    – सर्वसाहरण समतोल
३)आर्थिक वृद्धीचे सिद्धान्त  –  हयरॉड / डोमर
४) लॉंड केन्स – पैसा, व्याज आणि रोजगारचा सामान्य सिद्धान्त 



क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

१) समग्रालक्षी अर्थशास्त्र हे उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते.
उत्तर – बरोबर

२) राष्ट्रीय उत्पन्नात वाढ हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय उद्दीष्ट आहे.
उत्तर – चूक 

३) समाग्रलक्षी अर्थशास्त्र एकत्रीकरण पद्धतीचा अवलंब करते.
उत्तर – बरोबर

४) किंमत निश्चितीचे सिद्धांत समग्रलक्षी अर्थश्स्त्राचा विषय आहे.
उत्तर – चूक 

५) समग्रलक्षी अर्थशास्त्र हे एकूण परिणामांच्या अभ्यासशी संबंधित आहे.
उत्तर – बरोबर

६) राष्ट्रीय उत्पादन हे समग्रलक्षी चालाचे उदाहरण आहे.
उत्तर – बरोबर