१. सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ओळख
(Introduction To Micro-Economics)
अर्थशास्त्र ही सामाजिक शास्त्राची अशी शाखा आहे जी उत्पादन,वितरण,वस्तू व सेवांचा उपभोग आणि कार्यक्षम व्यवस्थापन यांच्याशी निगडीत असते त्यांचे मुख्यत्वे दोन भाग पडतात . सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र .सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आपल्याला लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तणूकीचे विश्लेषण करण्यात मदत करते तर समग्रलक्षी अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तणूकीशी निगडीत असते.
" विशिष्ट उत्पादन संस्था , विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमती ,वेतन ,उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय."
प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .
(१) सूक्ष्म अर्थशास्त्र व समर्ग अर्थशास्त्र या शद्बांचा सर्वप्रथम वापर रॅगनर फिश यांनी केला.
(२) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो.
(३) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मुल्य सिद्धांत म्हणूनही ओळखले जाते.
(४) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात विभाजन पद्धतिचा अवलंब केला जातो.
(४) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे आंशिक समतोलाचा दृृृष्टिकोन होय.
(ब) योग्य जोड्या लावा .
(१) अॅडम स्मिथ - अर्थशास्त्राचे जनक
(२) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र - वैयक्तिक घटक
(३) समग्रलक्षी अर्थशास्त्र - समग्र घटक
(४) प्रो. मार्शल - अर्थशास्त्राची मुलतत्त्व
(क) खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा.
(१) प्रा. मार्शल हे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात.
उत्तर : चूक.
(२) उत्पादन संस्थांच्या सिद्धांतांचा अभ्यास सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो.
उत्तर : बरोबर.
(३) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे साधनसामग्रीच्या वाटपाच्या प्रश्नाशी संबंधित आहे.
उत्तर : बरोबर.
(४) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात पूर्ण रोजगाराची परिस्थिती गृहीत धरली जाते.
उत्तर : बरोबर.
(५) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय सिद्धांत भाववाढीची समस्या सोडवप्यासाठी धोरणे सुचवतात.
उत्तर : चूक.
प्र. २ (अ) खलील स्ंनकल्पनांच्या व्याख्या द्या किवा स्पष्टीकरण करा.
१.सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र.
उत्तर : (१) अर्थव्यवस्थेतील अत्यंत छोट्या उपभोगाच्या आर्थिक वर्तनाचे विश्लेषणशस्त्र म्हणजे सुक्षलक्षी अर्थशास्त्र होय.
सुक्षलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक उपयोग, विशिष्ट उत्पादन संस्था, वस्तु व सेवा आणि उत्पादक घटक यांचे किमत निर्धारण, साधन संपत्ति चे वाटप इत्यादि बाबींचा अभ्यास करते.
२. औंशिक समतोल.
उत्तर : (१) सुक्षलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलचे स्वतंत्रपणे विश्लेषण करते . यालाच आंशिक समतोल असे म्हणतात.
२) अंशीक समतोल विश्लेषणात ‘ इतर परिस्थिति कायम असताना ‘ या मुल्भ्त गृहीतकाचा आधार घरून विवेचनाची सुरवात केली जाते.
३.आर्थिक कार्यक्षमता .
उत्तर : १) उत्पादन क्ष्त्रतील कार्यक्षमता, उपभोगच्या क्षेत्रातील करताक्षमता आणि उतपदांनाच्या रचणेसंदर्भातिल कार्यक्षता म्हणजे आर्थिक कार्यक्षमता होय.
२) सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आर्थिक कार्यक्षमता काशी प्राप्त होईल याचे स्पष्टीकरण करते.
४. वैयक्तिक आर्थिक घटक.
उत्तर : (१) अर्थव्यवस्थेतील लहनात लहान घटक म्हणजे विशिष्ट उपभोक्ता, विशिष्ट उत्पादक किंवा उत्पादन संस्था म्हणजे वैयक्तिक आर्थिक घटक होय.
(२) सूक्ष्म अर्थशास्त्र वैयक्तिक आर्थिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करते.
५) साधनसामग्रीचे वाटप.
उत्तर : १) विविध वस्तूंच्या आणि सेवांच्या उत्पादनासाठी केलेला साधनसंगरीचा वापर म्हणजे साधानसमगरीचे वाटप होय.
(२) सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र साधनसमगरीच्या कार्यक्षम वाटपाचा अभ्यास करते.
(ब) कारणे द्या किंवा विधाने स्पष्ट करा.
१. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांत म्हणून ही ओळखले जाते.
उत्तर : १) मागणी व पुरवठ्याच्या समटोलातून वस्तु व सेवांच्या किंमती ( मूल्य ) कश्या निश्चित होतात, याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो.
२) त्याच प्रमाणे मागणी व पुरवठ्याच्या समटोलातून भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या उत्पादनाच्या चार घ्तांक्या किंमती (मूल्य) / मोबदले कसे निश्चित होतात, याचे ही सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे स्पष्टीकरण केले जाते. म्हणून सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे मूल्य सिद्धांत म्हणून ओळखले जाते.
२. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घाटकांचा अभ्यास केला जातो.
उत्तर : १) सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र वैयक्तिक उपभोक्ता आणि वायक्तिक उत्पादक यांच्या अर्थीक वर्तनाचा व विशिष्ट वस्तु किंवा उत्पादक घटकाच्या किंमत निर्धारणाचा अभ्यास केला जातो.
२) सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, व्यापारचक्र, व्यवहारतोल इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास केला जात नाही. म्हणजेच सूक्ष्मलक्षी स्वरूप हे समुच्चयात्मक स्वरूपाचे नसून व्यक्तीगत स्वरूपाचे असते म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशासत्रात वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो.
३. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोलचे विश्लेषण केले जाते.
उत्तर : १) सूक्ष्मलक्षी अर्थशासत्रात एक उपभोक्ता किंवा एक उपतदन संस्था इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाते.
२) सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात ‘ इतर परिस्थिति कायम असताना ‘ या मुलभूत गृहीतकाचा आधार घेऊन आर्थिक चलांमधील परस्परांवलंबन व समग्र संतुलन या कडे दुर्लक्षा केले जाते. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात आंशिक समतोलचे विश्लेषण केले जाते.
४. सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांत अनेक गृहितांवर आधारित असतात.
उत्तर : १) सुक्षमलक्षी अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांना इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांचा सुलभतेने अभ्यास केला जातो. त्यमुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात ‘ इतर परिस्थिति कायम असताना ‘ या मूलभूत गृहीतकाचा आधार घेतला जातो.
२) त्याच प्रमाणे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र पूर्ण रोजगार, शुद्दभांडवलशाही, पूर्णस्पर्धा, सरकारचे निरहस्थक्षेपाचे धोरण इत्यादी गृहिटकांवर भर देते. सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांत अनेक गृहितांवर आधारित असतात.
५. सुक्षमलक्षी अर्थशास्त्रात सिमांत तत्वाचा विश्लेषणाचे साधन म्हणून वापर केला जातो.
उत्तर : १) उपभोक्ते हे महत्तम साधन प्राप्तीसाठी आणि उत्पादक हे महत्तम नफाप्राप्तीसाठी सिमांत तत्वाचा वापर करतात.
२) म्हणजेच सर्व सूक्ष्मलक्षीय आर्थिक निर्णय हे सिमांत पातळीवर घेतले जातात. म्हणून सुक्षमलक्षी अर्थशास्त्रात सिमांत तत्वाचा विश्लेषणाचे साधन म्हणून वापर केला जातो.
प्र. ३ टिपा लिहा
१.सूक्ष्मलक्षि अर्थशास्त्राची वैशिष्टे :
१) वयाक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास : सुक्षमलक्षी अर्थशास्त्रात लहान आर्थिक घटकांच्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. उदा. विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमन इत्यादि.
२) मूल्यसिधांत म्हणून ओळख : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असे म्हटले जाते. कारण वस्तु व सेवांच्या, तसेच उत्पादन घटकांच्या किंमती कश्या ठरतात त्याचा अभ्यास पृमुख्याने ह्या शाखेत केला जातो.
३) विभाजन पद्धतीचा (Slicing method) वापर : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्येस्थेचे लहनात लहान व्यक्तिक आर्थिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रतेक घातकाच स्वतंत्रपणे, तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलाशी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो.
४) अंशिक समतोल : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे अंशिक समतोलचे विश्लेषण होय. अंशिक समतोलात एक उपभोक्ता, एक उपत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. अंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्याच्या समतोलचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो व यासाठी ‘ इतर परिस्थिती कायम ‘ (Ceteris Paribus) या मूलभूत गृहुतकाचा आधार घेऊनच विवेचनाची सुरवात केली जाते . आर्थिक चलांमधील परस्परव्लंबांनाकडे हे विवेचन दुर्लक्ष करते.
५) सूक्ष्मदर्शी अध्ययन (Microscopic study): अर्थशास्त्राचे सूक्ष्मलक्षी अध्यायन म्हणजे सूक्ष्मदर्शी अर्थशास्त्र होय. या शाखेत आर्थिक घटकांचा सूक्ष्मस्तरावर अभ्यास केला जातो. प्रा. ए. पी. लर्नर यांच्या शब्दात असे म्हणता येईल की, “ सूक्ष्मअर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पहिले जाते.” अर्थाव्यव्साथारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती व कुटुंबे उपभोअत्याच्या रूपाने, अर्थवेवस्थेच्या संचलनात अश्या प्रकारे भूमिका पार पडतात हे अभ्यासनासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशींकडे जणू काही सुक्ष्मदर्शकातून पाहते.”
अर्थव्यवस्थारूपी शरीराच्या निरनिराळ्या पेशी म्हणजेच हजारो उपभोक्ते, हजारो उत्पादक किंवा उत्पादन संस्था, हजारो कामगार व उत्पादन साधंनांचे पुरवठादार आपले आर्थिक व्यवहार कशाप्रकारे करतात आणि समतोलची स्थिती काशी गाठतात याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात होतो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थवेवस्थेचा संग्रह पातळीवर अभ्यास केला जात नाही, तर त्यातील विशिष्ट घटकांचा सूक्ष्मपणे अभ्यास केला जातो.
६) साधन सामग्रीचे वाटप व आर्थिक कार्यक्षमतांचे विश्लेषण : निर्णीतल्या स्पर्धक गतक साधन सामग्रीचे वितरण कसे होते हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा महत्त्वाचा विषय आहे. वस्तु व उत्पादन घटकांच्या किंमती यांच्याद्वारे साधन सामग्रीचे निरनिराळ्या वस्तूंच्या उत्पादनात वितरण कसे ठरते याचे स्पष्टीकरण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. अर्थव्यावस्थेत कशाचे उत्पादन करावे ? किती प्रमाणात उत्पादन करावे ? उत्पादन केव्हा करावे ? उत्पादन कोठे करावे ? उत्पादन कसे करावे ? व झालेल्या उत्पादनाचे एकूण विभाजन व वितरण कसे करावे ? हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र निश्चित करते.
म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र उत्पन्नाच्या वितरणाचाही अभ्यास करते.
त्याचप्रमाणे साधंनांचे झालेले वितरण कार्याक्षम आहे का ? समाजाचे महत्तम आर्थिक कल्याणचे उद्दीष्ट त्याद्वारे सध्या होते का ? याची चिकित्सा ह्या शाखेत केली जाते.
७) सीमंत तत्वाचा वापर : सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विश्लेषण म्हणून सीमंत तत्वाचा वापर केला जातो. सीमंत नगामुळे किंवा एका वाढीव नगामुळे एकूण परिणमत होणारा आदल म्हणजे सीमंत परिणाम होय. सर्व सुकषमलक्षी आर्थिक निर्णय हे सीमंत पातळीवर घेतले जातात. त्यमुळे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या सर्व विश्लेषणात या संकल्पानेला अनन्यसाधारण महत्त्व आहे
thanks
Please follow & subscribe the blog ..
thanks
Please follow & subscribe the blog ..
0 Comments