२. उपभोकत्याचे वर्तन
         Consumer's Behaviour


   "उपयोगीता म्हणजे वस्तूंची उपयुक्तता होय .परंतू अर्थशास्त्रानूसार उपयोगिता म्हणजे वस्तूवरील गरज पूर्ण करण्याची शक्ती होय ."



(" वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय ".) प्रा.स्टॅन्ली जेव्हाॅन्स .

उपयोगितेची वैशिष्ट्ये

1. सापेक्ष संकल्पना=( उपयोगिता ही स्थल कालाशी संबंधित  असते. म्हणजेच काळानुसार व स्थळानुसार उपयोगी तेत बदल होत असतो.)


2. व्यक्तिनिष्ठ संकल्पना= (एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते ती व्यक्तीनुसार बदलते कारण लोकांची रुची, पसंती, आवड - निवड यामध्ये फरक असतो.)



3. नैतिकदृष्ट्या तटस्थ =( उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता   नैतिक दृष्ट्या तटस्थ असते. ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते ती कोणतीही गरज भागू शकते. ही उपयोगिता चांगले किंवा वाईट, नैतिक किंवा अनेतिक असा फरक करीत नाही.)


4. उपयोगीता हिंदी म्हणजे उपयुक्तता नव्हे =( उपयोगिता म्हणजे वस्तू मधील गरज भागवण्याची क्षमता होय . तर उपयुक्तता म्हणजे वस्तूंपासून उपभोक्त्याचे होणारे हीत  होय. उपयोगिता व्यक्तींच्या समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूंचे उपयोग मूल्य दर्शवते. ज्या वस्तूंमध्ये उपयोगिता असते ती उपयुक्त असलेच असे नाही.)



5. उपयोगिता म्हणजे आनंद नव्हे
 =( उपयोगिता आणि आनंद या दोन्ही संकल्पना वेगवेगळे आहेत. वस्तूंमध्ये उपयोगिता असली तरी तिचा उपभोग आनंद किंवा सुख देणारा असतोच असे नाही .)



6. उपयोगिता व समाधान वेगवेगळे आहेत= (योगिता व समाधान या जरी परस्पर संबंधीत संकल्पना असल्या , तरी त्यात फरक आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागवण्याची क्षमता होय. तर समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव होय. म्हणजेच उपयोगिता वस्तूशी संबंधित असते. तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते . उपयोगिता हे अपेक्षित असे समाधान असते. तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते.)


7. मापण करणे कठीण =( उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. अदृष्य आणि अमूर्त आहे. तिचे संख्यात्मक म्हणजेच अंकांमध्ये मापन करता येत नाही. परंतु एखादी  व्यक्ती अंदाजाने उपयोगिता मापन करू शकते)


8. गरजेच्या तीव्रते वर अवलंबून असते=( वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेची त्री वता किंवा निकड यावर अवलंबून असते. जेवढी गरजेची त्री वता तेवढी उपयोगिता अधिक असते. गरजेची त्रिवता कमी झाल्यास उपयोगिता कमी होते.)


9. मागणीचा  आधार =( उपयोगिता मागणीचा आधार आहे. एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता नसेल तर व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करणार नाही. जर ती वस्तू उपयोगिता देणारी असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल.)


  उपयोगितेचे प्रकार
1. रूप उपयोगिता (जेव्हा एखाद्या अस्तित्वात असलेल्या वस्तूचे  आकारमान किंवा स्वरूप बदलल्यामुळे उपयोगिता वाढते, तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात)



2. स्थल उपयोगिता (जेव्हा वस्तूचा वापर करण्याच्या  जागेत बदल झाल्यामुळे उपयोगिता वाढते तेव्हा त्यास  स्थल उपयोगिता असे म्हणतात. )


3 . काल उपयोगिता( काळानुसार वस्तूमध्ये जि उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात.)



4. सेवा उपयोगिता( जेव्हा समाजातील विविध घटकांना द्वारे इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविण्यात येतात. तेव्हा सेवा उपयोगिता निर्माण होते.)


5. ज्ञान उपयोगिता ( जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्याची ज्ञान उपयोगिता वाढते.)


6. स्वामित्व उपयोगिता( वस्तूंची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थलांतर होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते.)



     उपयोगितेच्या संकल्पना

उपयोगितेच्या दोन मुख्य संकल्पना

1. एकूण उपयोगिता  (म्हणजे वस्तूंच्या सर्व नगांच्या  उपभोगा पासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितेची बेरीज होय. वस्तूंच्या एकापाठोपाठ एक उपभोग घेतलेल्या सर्व घटकांपासून मिळालेली ही समग्र उपयोगिता असते.

TU= ΣMU OR
TUn=MU1 + MU2+MU3........MUn
 ए.उ. = Σ सी.उ. ( एकूण उपयोगिता म्हणजे सर्व सीमान्त उपयोगितांची बेरीज होय.)   

TU-> Total utility ,M.U.-> Marginal   
utility .

n-> Number  )




2. सीमांत उपयोगिता ( म्हणजे वस्तूंच्या प्रत्येक नगाच्या उपभोगा पासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम (अतिरीक्त) उपयोगिता होय. ही वस्तूंच्या शेवटच्या नगा पासून मिळालेली उपयोगिता असते. एकूण उपयोगी तेत शेवटच्या नगा मुळे पडणारी भर म्हणजे सीमांन्त उपयोगिता होय.)
MUn =TUn- TU (n-1)




       घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत


सिद्धांताचे विधान -"  इतर परिस्थिती स्थिर असताना मनुष्य जवळ असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास, त्यापासून मिळणारे अतिरिक्त उपयोगिता, त्या वस्तूच्या  साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर, क्रमश: घटत जाते."


सिद्धांताची गृहितके- 1) एकजिनसीपणा

                             2) एकच उपयोग

                             3) संख्यात्मक मापन
 
                             4) विवेकशीलता

                              5) सातत्य

                               6) योग्य आकारमान

                                7) स्थिरता

                               8) विभाज्यता





सिद्धांताचे अपवाद - 1) छंद
     
                             2) कंजूस व्यक्ति

                             3) मद्यपी व्यक्ती

                            4) संगीत

                            5) वाचन

                          6)  पैसा




सिद्धांताच्या मर्यादा -(टीका ) -

1)अवास्तव्य गृहितके

2) संख्यात्मक मापन

3) अविभाज्य वस्तू

4) पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता

5) एकच गरज





   सिद्धांताचे महत्व-


1) उपभोक्त्या साठी -

2) उत्पादकासाठी

3) मक्तेदारासाठी

4) सरकारसाठी

5)  अर्थमंत्री यासाठी

6) मूल्य विरोधाभास




सम - सीमांत उपयोगितेचा सिद्धांत


सम सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची गृहितके  =1) उपयोगितेचे संख्यात्मक मापन शक्य आहे.

2) उपभोक्त्याचे वर्तन विवेकपूर्ण असून महत्त्व समाधान प्राप्त करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

3) उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर आहे

4) उपभोक्ता सम्पूर्ण उत्पन्न अनुक्रमे 'अ','ब' आणि 'क' या वस्तूंवर खर्च करतो. व्हिडिओ

5) प्रत्येक वस्तूचे सर्व नग एकजिनसी आहेत.

6) वस्तुंच्या  किमती स्थिर राहतात.

7) उपभोक्त्याला 'अ','ब' आणि'क' या तिन्ही वस्तूंच्या किंमती व त्यांच्या सीमांत उपयोगितेचे कोष्टक माहिती आहे.



     सिद्धांताचे विधान

प्रा.अल्फ्रेड मार्शल यांच्या मते ,  इतर परिस्थिती कायम असताना उपभोक्ता आपले उत्पन्न विविध वस्तूवर अशा रीतीने करेल की त्याची सीमांत उपयोगिता व त्यांच्या किमती यांचे गुणोत्तर समान असेल.

जेव्हा प्रत्येक वस्तूंवर खर्च केलेल्या पैशाच्या शेवटच्या घटकाची सीमांत उपयोगिता समान असेल, तेव्हा त्या उपभोक्त्याला त्याच्या उत्पन्नाच्या खर्चातून सर्वाधिक एकूण उपयोगिता मिळेल.




प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .

१. उपयोगिता म्हणजे वस्तूमढील गरज भावण्याची क्षमता होय. 
२.जेव्हा वस्तूचा उपभोग वाढते तेव्हा सीमान्त उपयोगिता घटते. 
३.वस्तूच्या शेवटच्या नागपसून मिळालेली उपयोगिता म्हणजे सीमंत उपयोगिता होय. 
४.जेव्हा सीमंत उपयोगिता ऋण होते, तेव्हा एकूण उपयोगिता घटते.
५.रक्तदानात कल उपयोगिता असते.



ब] जोड्या लावा . 

१)सीमंत उपयोगिता – शेवटच्या नागची उपयोगिता 
२)सर्वाधिक समध्यंनाचा बिंदू – महत्तम एकूण उपयोगिता 
३)रूप उपयोगिता – लकडापासून फर्निचर बनवणे 
४)संख्यात्मक मूल्यमापन – घटत्या सीमंत उपयोगाच्या सिद्धांताचे गृहीतक 
५)सेवा उपयोगिता – शिक्षकाने दिलेले ज्ञान


क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 

१) उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. 
उत्तर – बरोबर 
२) उपयोगिता मागणीच्या नियमाला आधार आहे. 
उत्तर – बरोबर 
३) सुरवातीला सीमंत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता समान असतात. 
उत्तर – बरोबर 
४) घटत्या सीमंत उपयोगीतेचा सिद्धांत विवेकी उपभोकत्याचे आर्थिक वर्तन स्पष्ट करतात. 
उत्तर – बरोबर 
५) ऋण सीमंत उपयोगीता सर्वाधिक समाधान दर्शवतो. 
उत्तर – चूक