३[अ ] मागणीचे विश्लेषण
मागणी = इच्छा + खर्च करण्याची क्षमता + खर्च करण्याची मानसिकता
मागणी ची संकल्पना
" एखाद्या विशिष्ट वेळेला व विशिष्ट किंमती ला ग्राहक , वस्तूंची जी नगसंख्या खरेदी करण्यास तयार असतो , त्याला मागणी म्हणतात ."
१) उपयोगीता हा मागणीचा आधार असतो .
२) मागणी ही एक सापेक्ष संकल्पना आहे .
३) मागणीला विशिष्ट वेळेचा व किंमतीचा संदर्भ आवश्यक असतो.
वैयक्तिक मागणी व बाजार मागणी
वैयक्तिक मागणी ही एका व्यक्तीने केलेली मागणी होय .
" एखादी व्यक्ती विशिष्ट वेळेला एखाद्या वस्तूच्या निरनिराळ्या किंमतीला , वस्तूंच्या ज्या नगसंख्येची खरेदी करण्यास तयार असते त्याला वैयक्तिक मागणी म्हणतात ."
विशिष्ट वेळेला, विशिष्ट किंमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांकडून वस्तूंची जी एकूण नगसंख्या खरेदी केली जाते, तिला बाजार मागणी असे म्हणतात.
मागणी तक्ता - विशिष्ट कालावधीत , विविध किमतीनुसार विविध नगसंख्येची असलेली मागणी दर्शविनारा तक्ता म्हणजे मागणी तक्ता होय .
१) वैयक्तिक मागणी तक्ता - विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतीला वैयक्तिक उपभोक्ता किती नगसंख्येची खरेदी करतो हे ज्या तक्तात दर्शविलेले असते त्या तक्त्यास वैयक्तिक मागणी तक्ता म्हणतात.
२) बाजार मागणी तक्ता - विशिष्ट वेळी व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व उपभोक्ते एखाद्या वस्तूची किती नगसंख्या खरेदी करतात ,त्या तक्त्याला बाजार मागणी तक्ता असे म्हणतात.
मागणी निर्धारित करणारे घटक
१) किंमत - मागणी वर परीणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत होय .
२) उत्पन्न - मागणी वर परीणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पन्न होय .
३) लोकसंख्या -लोकांकडून वस्तू व सेवांची मागणी केली जाते.सर्वसाधारण पणे जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त मागणी होय.
४) आवडीनिवडी, सवयी व फॅशन - उपभोक्त्यांच्या आवडी -निवडी ,धंद ,सवयी ,फॅशन इ. वैयक्तिक घटकांचाही बाजार मागणी वर परीणाम होत असतो.
५) पर्यायी व पूरक वस्तूंच्या किंमती - पर्यायी व पूरक वस्तूंच्या किंमतीतील बदलाचा परिणाम मागणी वर होतो.
६) उत्पन्नाचे वाटप - उत्पन्न व संपत्तीच्या वाटपात असमानता असल्यास मागणी सर्वसाधारणपणे कमी असते . म्हणजे उत्पन्न व संपत्तीच्या वाटपावर मागणी अवलंबून असते.
७) भविष्य कालीन किंमतीचा अंदाज - ग्राहकांच्या किंमतीबाबतच्या भविष्य कालीन अंदाजावर मागणी अवलंबून असते
८) जाहिरात - ज्या वस्तूंची रेडिओ , दूरदर्शन , वर्तमानपत्रात प्रभावी जाहिरात केली जाते. अशा वस्तूंच्या मागणीत वाढ होते . सद्य परिस्थितीत जाहिरात हा मागणी वर परीणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे.
९) करविषयक धोरण - शासनाच्या करविषयक धोरणाचा परिणाम मागणी वर होतो.
१०) इतर घटक - नैसर्गिक परिस्थिती , परंपरा , राजकीय व सामाजिक परिस्थितीतील बदलांचा परिणाम मागणी वर होतो.
मागणीचे प्रकार
१) प्रत्यक्ष मागणी - प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी ज्या वस्तूंची मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी म्हणतात.
२) अप्रत्यक्ष मागणी - अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असे ही म्हणतात.ज्या वस्तूंची मागणी उपभोग्य वस्तूच्या उत्पादनासाठी केली जाते. तेव्हा अशा वस्तूंच्या मागणीला अप्रत्यक्ष मागणी म्हणतात.
३) संयुक्त मागणी - एखादी गरज भागविण्यासाठी जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते, तेव्हा त्याला संयुक्त मागणी म्हणतात.
४) संमिश्र मागणी - एखाद्या विशिष्ट वस्तूचा वापर जेव्हा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो.तेव्हा अशा वस्तूंच्या मागणीला संमिश्र मागणी म्हणतात.
५) स्पर्धात्मक मागणी - पर्यायी वस्तूंच्या मागणीला स्पर्धात्मक मागणी म्हणतात .
मागणीचा नियम
मागणीचा नियम हा उपभोगातील एक महत्त्वाचा व मूलभूत नियम आहे.
" इतर परिस्थिती स्थिर असता, किंमत कमी झाली म्हणजे मागणी विस्तारते आणि किंमत वाढली असता मागणी संकोचते ."
मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो .
१) घटत्या सीमांत उपयोगीतेचा नियम
एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ झाली असता सीमांत उपयोगिता क्रमश : घटत जाणारी असते . म्हणून एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली तर उपभोक्ता वस्तूंच्या जास्त नगसंख्येची मागणी करतो .
२) उत्पन्न परिणाम
जेव्हा किंमत घटते तेव्हा उपभोक्त्याची खरेदीशक्ती वाढते . त्यामुळे तो त्या वस्तूंची जास्त प्रमाणात मागणी करू शकतो .याला उत्पन्न परिणाम म्हणतात.
३) पर्यायता परिणाम
पर्यायी वस्तूंबाबत असे दिसून येते की , एखाद्या वस्तूची किंमत वाढली तर त्या वस्तूला पर्यायी असलेल्या वस्तू स्वस्त वाटतात . म्हणून उपभोक्ता अशा वस्तूंची जास्त मागणी करतो . म्हणजे किंमत वाढलेल्या वस्तूंची मागणी घटते . याला पर्यायता परिणाम असे म्हणतात.
४) विविध उपयोगी वस्तू
जेव्हा एखादी वस्तू अनेक गरजा भागविण्यासाठी वापरली जाते , अशा वस्तूंची किंमत कमी झाली असता मागणी वाढते याउलट वस्तूंची किंमत वाढली असता मागणी कमी होते .
मागणीच्या नियमांची गृहितके - मागणी चा नियम खालील गृहितकांवर आधारलेला आहे.
१) लोकसंख्येचे आकारमान व संरचना कायम असेल तर...
मागणी ही लोकसंख्येचे आकारमान व तिच्या संरचनेवर अवलंबून असते. लोकसंख्येत वाढ किंवा घट झाली तर किंमत स्थिर असूनही मागणी त वाढ किंवा घट होते .म्हणून लोकसंख्या स्थिर असली पाहिजे.
२) उपभोक्त्याचे उत्पन्न स्थिर असेल तर.....
उत्पन्न हा मागणीवर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उत्पन्नातील बदलांमुळे किंमत स्थिर असूनही मागणी बदलते .
३) उपभोक्त्याच्या आवडीनिवडी, सवयी , रूढी व परंपरा कायम असतील तर.....
उपभोक्त्त्याच्या आवडीनिवडी , छंद, सवयी, रूढी व परंपरा इत्यादीत कोणताही बदल होत नाही , असे गृहीत धरले जाते.कारण आवडी -निवडी , छंद, रूढी व परंपरा यातील बदलांमुळे किंमत स्थिर असूनही मागणी त बदल होतो.
४) भविष्य कालीन किंमत विषयक अंदाज स्थिर असतील तर....
उपभोक्त्याचे किंमत विषयक भविष्य कालीन अंदाज स्थिर असावे . कारण भविष्य काळात किंमतीत वाढ किंवा घट होईल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर किंमत स्थिर असूनही वर्तमानकालीन मागणी त घट किंवा वाढ होते.
५) पर्यायी व पूरक वस्तूंच्या किंमती त बदल झाला नाही तर....
पर्यायी व पूरक वस्तूंच्या किंमती त कोणतेही बदल होत नाहीत असे मानले जाते. एखाद्या वस्तूच्या किंमतीतील बदलाचा परिणाम अन्य पर्यायी किंवा पूरक वस्तूंच्या मागणी वर होतो .
६) शासनाच्या धोरणात बदल झाला नाही तर...
शासनाच्या करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही.कारण त्याचा परिणाम मागणी वर होऊ शकतो.
मागणीच्या नियमाचे अपवाद
मागणीचा नियम वस्तूंची किंमत व मागणी यातील व्यस्त संबंध स्पष्ट करतो . परंतु काही वेळेस किंमत व मागणी नगसंख्या यात समसंबंध आढळतो .
१) गिफेन वस्तू :- हलक्या दर्जाच्या किंवा कनिष्ठ वस्तूंना गिफेन वस्तू म्हणतात. जेव्हा या वस्तूंच्या किंमती कमी होतात तेव्हा पूर्वीपेक्षा या वस्तूंची कमी नगसंख्या खरेदी केली जाते. कारण लोकांच्या वास्तव उत्पन्नात वाढ झाल्यामुळे लोकांची पसंती चांगल्या प्रतीच्या वस्तूसाठी राहते.
२) प्रतिष्ठेच्या वस्तू : - हिरे ,फार जास्त किंमतीच्या मोटार कार , आलिशान बंगले इ. प्रतिष्ठेच्या वस्तू होत. अशा वस्तूंच्या वापरामुळे प्रतिष्ठा वाढते असे मानले जाते. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किंमती त वाढ झाली असता त्यांच्या मागणीत वाढ करतात म्हणून प्रतिष्ठेच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद मानल्या जातात.
३) किंमतीचा आभास किंवा उपभोगत्यांचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन :- अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की , जास्त किंमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात म्हणून अशा वस्तूंची किंमत वाढली असता त्यांची मागणी ही वाढते .
४) अनुकरणाचा परिणाम :- उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या उपभोग पध्दतीचे कमी उत्पन्न गटातील व्यक्तीने अनुकरण करणे याला अनुकरण परिणाम म्हणतात .
५) अज्ञान :- काही वेळेस व्यक्तिंना बाजाराविषयीचे योग्य ज्ञान नसते . किंमतीतील उताराविषयी त्यांना जाणीव नसते , म्हणून किंमत जास्त असतानाही अधिक खरेदी करतात.
६) भविष्यकालीन किंमतीचा अंदाज :- जेव्हा लोकांना भविष्य काळात वस्तूंच्या किंमती वाढतील असे वाटते , तेव्हा त्यांचे वर्तन मागणीच्या नियमाप्रमाणे आढळत नाही .याचाच अर्थ वस्तूंच्या किंमती वाढत असताना लोक अधिक खरेदी करतात .
७) सवयीच्या वस्तू :- मागणी नियमाला अपवाद असतात .उदा. ज्या व्यक्तींना तंबाखू , सिगारेट ह्या वस्तूंच्या सेवनाची सवय जडलेली असताना ,ह्या वस्तूंच्या किंमती वाढल्या तरी खरेदी केली जाते. अशा प्रकारे हा मागणी नियमाचा अपवाद आहे.
मागणीतील विचलन व मागणी तील बदल
मागणी तील विचलन :- मागणी अनेक घटकांवर अवलंबून असते. किंमत हा मागणी वर परीणाम करणारा महत्त्वाचा घटक होय. इतर परिस्थिती त बदल न होता किंमतीतील बदलांमुळे जेव्हा मागणीत चढ उतार होतात तेव्हा त्याला मागणी तील विचलन म्हणतात.
१) मागणी तील विस्तार /प्रसरण :- इतर परिस्थिती त कोणताही बदल न होता वस्तूंची किंमत कमी झाल्याने मागणीत वाढ होते तेव्हा त्यास मागणीचा विस्तार असे म्हणतात.
२) मागणी चा संकोच किंवा आकुंचन:- इतर परिस्थिती त कोणताही बदल न होता वस्तूंच्या किंमती त वाढ झाली असता मागणी कमी होते तेव्हा त्यास मागणीचा संकोच असे म्हणतात.
मागणी तील बदल - मागणी तील बदल म्हणजे मागणी तील वृद्धी किंवा ऱ्हास होय. किंमती व्यतिरिक्त उत्पन्न , लोकसंख्या , उपभोक्त्त्याच्या आवडीनिवडी यासारखा अनेक घटकांचा परिणाम मागणी वर होत असतो.
मागणी तील वृद्धी - " किंमत स्थिर असताना इतर घटकातील बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याला मागणी तील वृद्धी म्हणतात ."
मागणीतील ऱ्हास - " मागणी वर प्रभाव असणाऱ्या किंमती व्यतिरिक्त अन्य घटकांमधील बदलांमुळे जेव्हा मागणी कमी होते तेव्हा त्याला मागणी चा ऱ्हास म्हणतात."
प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .
१.जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते, तेव्हा मागणी संकोचते.
२.जेव्हा स्थिर किमतील पूर्वी पेक्षा जास्त नाग खरेदी केले जाते, तेव्हा त्याला मागणीतील ह्रास म्हणतात.
३.पेट्रोलची किंमत वाढते तेव्हा करची मागणी घटते.
४.बाजार मागणी म्हणजे सर्व ग्राहकांनी केलेली एकूण मागणी होय.
५.अप्रत्येक्ष मागणी परोक्ष मागणी म्हणूनही ओळखली जाते.
ब] जोड्या लावा
१) मागणी व किंमत – व्यस्त संबंध
२) चहा व कॉफी – पर्यायी वस्तु
३) कनिष्ठ वस्तु – गिफेण वस्तु
४) उत्पादनाचे घटक – अप्रत्यक्ष मागणी
५) पेन व शाई – संयुक्त मागणी
क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
१) मागणीवक्र उजवीकडून उजवीकडे वर जाणारा असतो.
उत्तर – चूक
२) इच्छा म्हणजे मागणी होय.
उत्तर – चूक
३) जेंव्हा मागणीत वृद्धी होते तेव्हा मागाणीवक्र डाव्या बाजूला स्थलांतरीत होतो.
उत्तर – चूक
४) मागणी नागसंख्या किंमतीच्या समदिशेने बदलते.
उत्तर –
५) मागणीचा नियम प्रा. रोबीन्सने स्पष्ट केला आहे.
उत्तर – चूक
६) वैयक्तिक मागणी ही एका ग्राहकाची मागणी असते.
उत्तर – बरोबर

0 Comments