3. मागणीची लवचिकता
         Elasticity of Demand


"बदलत्या किमतींना मागणीचा प्रतिसाद कसा असतो याचे मोजमाप करणारी संकल्पना म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय".

   लवचिकता म्हणजे संवेदनशीलता(sensitivity ) होय.
" मागणीची लवचिकता म्हणजे किमतीतील बदलामुळे मागणीत  घडून येणाऱ्या बदलांचे प्रमाण होय ."


 मागणीच्या लवचिकतेचे प्रकार


१) मागणीची किंमत लवचिकता
" किंमतीतील शेकडा बदलामुळे मागणीत जो शेकडा बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात."


मागणीची किंमत लवचिकता =  मागणीतील शेकडा बदल/ किंमतीतील शेकडा बदल

सूत्र  मागणी लवचिकता= %∆म /%∆ क

(  जर मागणीची किंमत लवचिकता शेकडा प्रमाणात मोजावयाची असेल तर).



२) मागणी नीची उत्पन्न लवचिकता

" उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधा ला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात."

मागणीची उत्पन्न लवचिकता= मागणी तील शेकडा बदल / उत्पन्नातील शेकडा बदल


मा. उत्पन्न लवचिकता= %∆म /   %∆ य





३) मागणीची छेदक लवचिकता
" मागणीची लवचिकता पर्यायी आणि परस्परपूरक वस्तूंबाबत दिसून येते. मागणीची छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूंच्या किमतीतील बदलाचा अन्य पर्यायी वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल होय ."

मागणीची छेदक लवचिकता= अ वस्तूंच्या मागणीतील शेकडा बदल / ब वस्तूंच्या किंमतीतील शेकडा बदल


म्हणजेच =मा.छेदक लवचिकता=%∆अ/%∆ब

∆म्हणजे बदल ,अ म्हणजे मूळ वस्तू ,ब म्हणजे दुसरी पर्यायी वस्तू ,% म्हणजे शेकडा .



  मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार

१) अनंत/ संपूर्ण लवचिक मागणी

    किंमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी जेव्हा अनंत पटीने बदलते तेव्हा त्याला अनंत/ संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात.


२) संपूर्ण अलवचिक मागणी


किंमतीमध्ये कोणताही बदल झाला तरी  मागणी जेव्हा स्थिर असते तेंव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात .



 ३) एकक लवचिक मागणी

     किमतीतील बदलाच्या प्रमाणे इतकेच वस्तूच्या मागणीच्या बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकच लवचिक मागणी म्हणतात.





४)  अधिक लवचिक मागणी

       किंमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला अधिक लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असे म्हणतात.


५) कमी लवचिक मागणी

       जेव्हा किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी किंवा मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे असे म्हणतात.




   मागणीच्या किंमत लवचिकतेचे मोजमाप


१) गुणोत्तर पद्धत

     मागणीची लवचिकता मोजण्याच्या गुणोत्तर पद्धती ला गणितीय किंवा शेकडेवारी पद्धत असे म्हणतात.
       प्रा.फ्लक्स यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीत मागणीतील शेकडा बदलाला किंमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणी लवचिकता मोजली जाते. त्यासाठी खालील सूत्राचा वापर केला जातो.


मागणीची लवचिकता=    मागणी तील शेकडा बदल  / किंमतीतील शेकडा बदल




२) एकूण खर्चाची पद्धत

       ही पद्धत  प्रा . मार्शल यांनी विकसित केली आहे. या पद्धतीला एकूण उत्पन्न पद्धत असे म्हणतात. या पद्धतीत एकूण खर्चातील बदलाच्या सहाय्याने मागणीची लवचिकता मोजली जाते. मूळ किमतीला वस्तुवर होणारा एकूण खर्च व बदललेल्या किंमतीला होणारा एकूण खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता मोजता येते.
    किमतीत बदल होऊनही एकूण खर्च जेव्हा बदलत नाही. तेव्हा मागणी एकक लवचिक असते. किमतीत बदल झाल्यानंतर मागणीत बदल होतो. परंतु एकूण खर्च आधीच्या खर्चापेक्षा जास्त असतो. तेव्हा मागणी एकापेक्षा जास्त असते. आणि एकूण खर्च जेव्हा मूळ खर्च पेक्षा कमी असतो. तेव्हा मागणी एका पेक्षा कमी असते.



३) बिंदू पद्धत/ भूमिती पद्धत

        गुणोत्तर पद्धत किंवा खर्च पद्धतीत आपण मागणी वक्राच्या एखाद्या बिंदूवर मागणीची लवचिकता मोजू शकत नाही. म्हणून प्रा. मार्शल यांनी आणखी एक पद्धत विकसित केली आहे. तिला बिंदू पद्धत म्हणतात. या पद्धतीत खालील सूत्र च्या साह्याने मागणीची लवचिकता मोजली जाते.


म१ या बिंदूवर मागणीची लवचिकता=

 म १  बिंदू पासून मागणीवक्राचे खालील अंतर / म१ बिंदू पासून मागणीवक्राचे वरील अंतर


म१ बिंदूवर मागणीची लवचिकता=  म१,म४ / म१, म


मागणी ची लवचिकता =   मागणी वक्रावरील बिंदूपासून खालील अंतर / मागणी वक्रावरील बिंदूपासून वरील अंतर

                = सब / सक = एकक लवचिक




मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक


१) वस्तूंचे स्वरूप :-  जीवनावश्यक वस्तू, चैनीच्या वस्तू यावर मागणीची लवचिकता अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जीवनावश्यक वस्तूंची मागणी अलवचिक असते, तर चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते.


२) टिकाऊपणा:-   सर्वसामान्यपणे टिकाऊ वस्तूंची मागणी लवचिक असते तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते.


३) पर्यायी वस्तू:-   एखाद्या वस्तूला अनेक पर्याय उपलब्ध आहेत किंवा नाही, या वस्तूच्या मागणीची लवचिकता अवलंबून असते. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात, अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते.



४) वस्तूंचे उपयोग:-  ज्या वस्तू एकाच वेळेस अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येतात अशा वस्तूंची मागणी सामान्यपणे लवचिक असते.



५) किंमत :-  ज्या वस्तूंच्या किंमती फार जास्त कींवा फार कमी असतात अशा वस्तूंची मागणी सामान्यतः अलवचिक असते .


६) सवयी :-  सवयीच्या वस्तूंची मागणी अलवचिक असते.


७) उपभोक्त्याचे उत्पन्न :-  उत्पन्न पातळी जास्त असेल तर मागणी अलवचिक असते.परंतु उत्पन्नाची पातळी कमी असेल तर मागणी अलवचिक असते.



८) खर्चाचे उत्पन्नाशी प्रमाण :-   ज्या वस्तूवर आपण एकूण उत्पन्नाचा मोठा हिस्सा खर्च करतो . अशा वस्तूंची मागणी सर्व साधारणपणे अलवचिक आहे.


९)  पूरक वस्तू  :-  पूरक वस्तूंची मागणी संयुक्त मागणी असते .




मागणीची लवचिकता या संकल्पनेचे उपयोग


१)   मक्तेदारी व मागणीची लवचिकता :-   जास्तीत जास्त नफा मिळविणे हे मक्तेदाराचे उद्दिष्ट असते. मक्तेदारीत एकच विक्रेता असल्याने त्याचे पुरवठा व किंमतीवर पूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदार किंमत धोरण ठरवून जास्त नफा मिळवू शकतो.




२) करविषयक धोरण व मागणीची लवचिकता :-   करविषयक धोरण निश्चित करण्यासाठी शासणाला मागणीची लवचिकता या संकल्पनेचा उपयोग होतो.वस्तू व सेवांवर कर आकारणी करताना अर्थमंत्र्याना मागणीची लवचिकता विचारात घ्यावी लागते. शासनाला जर जास्त महसूल हवा असेल तर  अलवचिक मागणी असलेल्या वस्तूंवरील करात शासनाकडून नेहमी वाढ केली जाते.




३)   वेतन निश्चिती व मागणीची लवचिकता   :-  कामगार संघटनांना ही संकल्पना उपयुक्त ठरते. जेव्हा कामगारांना माहित असते कि त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची मागणी अलवचिक आहे. तेव्हा ते जास्त वेतनाची मागणीसाठी आग्रह धरू शकतात.


  ४)  आंतरराष्ट्रीय व्यापार व मागणीची लवचिकता :-   आंतरराष्ट्रीय व्यापारात सेवाशर्ती ठरविण्यासाठी मागणीची लवचिकता या संकल्पनेचा उपयोग होतो.जे देश अलवचिक मागणी असलेल्या वस्तूची निर्यात करतात . अशा देशांना निर्यात वस्तूंची किंमत वाढवून जास्त उत्पन्न मिळू शकते .




५)   सार्वजनिक सेवा सुविधा :-   रेल्वे सारख्या सार्वजनिक सुविधांचा ग्राहकांची अलवचिक मागणी असते त्यामुळे ग्राहकांचे शोषण टाळण्यासाठी शासनाची मक्तेदारी आवश्यक असते.



   
   
   

प्र. १ ) अ] रिकाम्या जागा भरा .

१.मिठाची मागणी अलवाचीक असते.

२.कनिष्ठ वस्तूंसाठी मागणी उत्पन्न लवचीकता नकारात्मक असते.

३.संपूर्ण लावचीक मागणी वक्र क्ष-अक्षाला समांतर असतो.

४.मागणीची छेदक लवचिकता पर्यायी वस्तूंना लागू पडते.

५.कमी लावचीक / अलावचीक मागणी वक्र लांबांतर असतो.



ब] जोड्या लावा

१) कर व पेट्रोल – पूरक वस्तु
२) बिनू पद्धत – भूमीती पद्धत
३) जीवनावशक वस्तु – लावचीक मागणी



क] खलील विधाने चूक की बरोबर ते लिहा.

१) चैनीच्या वस्तूंची / विजेची मागणी लावचीक असते
उत्तर – बरोबर

२) संपूर्ण अलावचीक मागणीचा वक्र क्ष-अक्षाला समांतर असतो .
उत्तर – चूक

३) एकूण खर्च = किंमत X नगसंख्या .
उत्तर – बरोबर

४) एकक लवचीक मागणी व्यवहारात क्वचित आढळून येते.
उत्तर – चूक

5) मागणीच्या लावचीकतेची संकल्पना अर्थमंत्र्याला उपयुक्त असते / ठरते.
उत्तर – बरोबर

6) नाशवंत वस्तूची मागणी आळवचीक असते.
उत्तर – बरोबर